Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चुलत दिराने महिलेला उसने पैसे देत त्या बदल्यात तिचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. नवऱ्याच्या उपचारासाठी महिलेला चुलत दिराने पैसे दिले. ते पैसे परत न करू शकल्याचा फायदा घेत दिराने वहिनेवर अत्याचार केला. हा प्रकार गेल्या चार महिन्यापासून ते जून २०२३ या कालावधीत ताथवडे येथे घडला. (Shocking! Sister-in-law assaulted by Brother in law in Pimpri-Chinchwad)
वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याप्रकरणी महिलेने चुलत दिराच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांनी आपल्या पतीच्या उपचारासाठी चुलत दिराकडून एक लाख रुपये घेतले होते. ते पैसे परत देऊ शकल्या नाहीत. (Pimpri News) त्याचा फायदा घेत आरोपीने त्यांना खरेदी करण्याच्या बहाण्याने ताथवडे येथील लाजवर बोलवून घेतले. तेथे आरोपीने फिर्यादीच्या मनाविरुद्ध वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी समिता राजेंद्र गोरे
Pimpri News : पिंपरी-चिंचवड आरटीओ कडून दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
Pimpri News : दिघीत महिलेचा विश्वास संपादन केली फसवणूक; सोने व रोख रक्कम लंपास