Pimpri News : पिंपरी : पुणे : कंपनी मध्ये ओव्हरटाईम करून घेत असताना, सतत कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे व तसेच मानसिक छळ केल्याने उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला.
व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
गव्हाणे वस्ती, भोसरी येथे शनिवारी (दि. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास आताहत्येची ही घटना उघडकीस आली.
सुशील भीमसिंह पाटील (२७) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी सुशील याचा भाऊ सागर भीमसिंह पाटील यांनी भोसरी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १६ ऑक्टो.२०२३ ) फिर्याद दिली. त्यानुसार एस. एच जे इन्टेल टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ऑपरेशन मैनेजर नीरज द्विवेदी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील हा उच्चशिक्षित होता. तो एस. एच जे इन्टेल टेक प्रायव्हेट लिमिटेड या मध्यप्रदेश येथील कंपनीत काम करत होता. त्याचे काम हे वर्क फ्रॉम होम होते. यावेळी इंटरनेटचा अडथळा आला किंवा इतर काही अडचणी आल्या तर व्यवस्थापक निरज द्विवेदी हा सुशील याच्याकडून ओव्हरटाईम करून घेत होता, तसेच ओव्हरटाईम नाही,तर पुअर रिमार्क दिला जाईल व मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. आणि इतर ठिकाणीही तुला काम मिळणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या आरोपी नीरज द्विवेदी सुशील याला देत होता.
सुशील याच्या कामांमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या असता, व्यवस्थापक निरज याने याप्रकरणी सुशीलला कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकले व वारंवार मानिसक व शारीरिक त्रास देऊन सुशील याला आत्महत्येस प्रवृत्त केले.
या त्रासाला कंटाळून त्याने गव्हाणे वस्ती, भोसरी येथे आपल्या राहत्या घरी शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली असे फिर्यादीत नमूद आहे.