Pimpri News : पिंपरी, (पुणे) : हिंजवडी, शिरगाव, तळेगाव, देहूरोड, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन महिलांशी गैरवर्तन करून गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी चिंचवड च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pimpri News)
बुद्धदेव विष्णु विश्वास (वय- २४), व मिंदु मिहिर विश्वास, (वय – २६) रा. दोघेही सद्या रा. व्दारका हॉटेल, बालाजी मंदिरा जवळ, आळंदी रोड, भोसरी, पुणे. मुळ रा. गाव वर्धमान, थाना-कोकोबेन, जिला-दुर्गापुर, राज्य – पश्चिम बंगाल असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक महिला दवाखान्यातून उपचार घेवुन मोटारसायकल वरुन घरी जात असताना संत तुकाराम साखर कारखाना कासारसाई जवळ एका अज्ञात इसमाने अडवुन मारहाण करुन तीचे गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र, कानातील टॉप्स, अंगठी जबरदस्तीने हिसकावुन जबरी चोरी करुन अज्ञात इसम पळून गेल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात एका महिलेने दिली होती. (Pimpri News)
तसेच ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी डेन्टल क्लिनीक, कासारसाई येथे डेंटल क्लिनीक मध्ये एकटया असलेल्या महिलेला पाहून तिचे डोळ्यात मिरची पुड टाकुन तीचे गळ्यातील सोन्याची चैन व पर्स जबरदस्तीने हिसका मारुन चोरी करुन तेथुन पळुन गेल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन प्रमाणे गुन्हा नोंद होता. तसेच अशाच प्रकारच्या शिरगाव, देहुरोड व तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे देखिल अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. सदरचे प्रकार गंभीर स्वरुपाचे असल्याने आरोपी अटक करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत वरीष्ठांनी आदेश दिले होते. (Pimpri News)
सदर घटनेचा गुन्हे शाखा युनिट-४ कडील अधिकारी व अंमलदार तपास करीत असताना पोलीस हवालदार तुषार शेटे व प्रशांत सैद यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी निष्पन्न केला. बुधवारी (ता. ०७) हिंजवडी परिसरात आरोपी असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्याचंही नावे वरीलप्रमाणे सांगितली. (Pimpri News)
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी, शिरगाव, तळेगाव, देहूरोड, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच पुढील तपासासाठी आरोपींना हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, पोलीस हवालदार प्रविण दळे, रोहिदास आडे तुषार शेटे, मोहम्मद गौस रफिक नदाफ पोलीस नाईक वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोलीस शिपाई प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.