Pimpri Chinchwad News : आंदोलक असे हिंसक होतील याबाबत पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.! वाहतूक कोंडी होताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मराठा समाजाचे आंदोलन ठिकठिकाणी उग्र स्वरूप धारण करत असल्याचे पिंपरी चिंचवड भागात दिसून आले.
उग्र स्वरूप धारण
मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी आमदारांची घरं आणि कार्यालये पेटवल्याची घटना घडली होती. हेच जाळपोळीचं लोन पिंपरी- चिंचवड मध्ये येऊन पोहचलं आहे.
आळंदी दिघी रोडवर टायर पेटवण्यात आली. यामुळे काही काळ आळंदीहून दिघी आणि भोसरी ला जाणाऱ्या दिशेने वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस पोहचले, असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आंदोलक असे हिंसक होतील, जाळपोळी च्या घटना सातत्याने घडताना या मराठा आंदोलना दरम्यान दिसत आहे. याबाबत पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.