Paud Police News : लोणी काळभोर, (पुणे) : पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारक चाचवली (ता. मुळशी) गावाशेजारी असलेल्या मुळशी धरणाच्या बाजूला एका अनोळखी २५ ते ३० वर्ष वयोगटातील महिलेचा खून केलेला मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी (ता. २४) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. Paud Police News
याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मृगदीप सुधाकर गायकवाड, वय -३४ यांनी फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे आव्हान पौड पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी धरणाच्या पाण्याच्या कडेला असलेल्या वारक चाचवली ग्रामपंचायत हद्दीत एका स्त्रीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पौड पोलिसांना मिळाली होती. सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर मयत महिलेच्या अंगावर अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून, हत्याराने हातावर, छातीवर, पोटावर, गळयावर, लहान मोठे वार करण्यात आल्याचे दिसून आले. Paud Police News
दरम्यान, मयताचे अंगावर अर्धवट कपडे दिसून येत आहेत. तसेच प्रेताचे मानेच्या खाली पाठीवर “त्रिशुल” गोंदलेले दिसत असुन उजवे हाताचे मनगटावर इंग्रजी अक्षरात ”गणेश” इंग्रजीतून गोंदवले असुन “लाल रंगाचा बदाम (लाईफ लाईनचे सिम्बॉल)” गोंदलेले दिसत आहे. मयत बॉडी पुर्ण फुगलेली दिसत असुन त्वचा पांढरी पडलेली आहे. अशा वर्णनाच्या अनोळखी स्त्रीच्या वारसांचा तसेच नातेवाइकांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आवाहन आहे.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शानाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे करीत आहेत. Paud Police News