मुंबई : दगडी चाळीतील कुख्यात गुंड अरुण गवळीला मुलाच्या लग्नासाठी चार दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अरुण गवळीला पत्नीच्या आजारपणासाठी सांचीत रजा देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कमी कालावधीचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
अरुण गवळी यांच्या मुलाचे लग्न १७ नोव्हेंबरला आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला होता.
पॅरोलवर जाताना अरुण गवळी याने पोलिसांच्या सुरक्षा कड्यात जावे व याचा सर्व खर्च अरुण गवळीनेच करावा, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. यावर अरुण गवळीला पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
मे २०२० साली लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अरुण गवळीच्या मुलीचे लग्न होते. तेव्हा देखील गवळी याला पॅरोल देण्यात आला होता. मात्र, वाढलेल्या कोरोना परिस्थितीमुळे लग्न रद्द करण्यात आले होते.
चित्रपटातील अभिनेता अक्षय वाघमारे सोबत योगिता गवळीचे लग्न झाले होते.