पुणे : पुतण्याने काकीचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी आरोपीवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४० वर्षीय काकीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ३० वर्षीय पुतण्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी फिर्यादी या आंघोळ करत असताना आरोपीने त्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर हे फोटो फिर्यादीला दाखवून ब्लॅकमेल करून प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले.
चार वेळेस फिर्यादीला बाहेर भेटण्यासाठी बोलावले. तसेच ऐकले नाही तर हे फोटो पती आणि जावयाला दाखवून तुझी इज्जत घालवील अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या त्याच्या या त्रासामुळे फिर्यादी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.