लहू चव्हाण, पाचगणी
Mahabaleshwar News पाचगणी, (सातारा) : महाबळेश्वर येथील केटस पॉइंटवर (Cats Point in Mahabaleshwar) माकडाने (attacked by a monkey) एका १२ वर्षीय मुलावार (A 12-year-old boy) हल्ला केल्याची घटना केल्याची घटना घडली. गुरुवारी (ता. ०४) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण ( spread an atmosphere of fear) पसरले असून या माकडांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त ( department has started gaining momentum) करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Mahabaleshwar News)
तक्रारी करूनही कारवाई नाही
निलेश तोमर (वय – १२, रा. मुंबई) असे हल्ला झालेल्या मुलाचे नाव आहे. स्थानिक वन समिती यांच्याकडे अनेक वेळा पर्यटकांनी तक्रारी करून देखील अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ घनदाट जंगलात असल्याने राज्यभरातून या ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. आलेल्या पर्यटकांकडून या माकडांना सोबत आणलेला खाऊ हातामध्ये देताना अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तसेच काही माकडे हि नागरिक दिसल्यानंतर चवताळून त्यांच्या अंगावर जात आहेत. व हाताला, पायाला जोरदार चावा घेत आहेत.
बुधवारी (ता. ०३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मॉन्टी वेल्हार (वय – ३९, रा. पुणे) यांच्यावरही माकडाने जोरदार हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात वेल्हार यांच्या दंडाला चावा घेतल्याने दंडातील तीन नस तुटल्या आहेत. त्यांच्यावर महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, केटस पॉइंटवर दररोज माकडांच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने या पॉइंटवर माकडांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने तत्परतेने या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..!