Lonikand Crime | लोणीकंद, (पुणे) : मोटारसायकल वरून जाणार्या तरूणास पकडून त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याच्या खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेणार्या केसनंद (ता. हवेली) येथील दोघांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ओंकार नरहरी आळंदे (वय- २१, रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) आणि तानाजी अर्जुन जाधव (वय-२१ रा. लाडबा वस्ती, केसनंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत करम हसुन मनिहार (वय-२० रा. केसनंद) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास केसनंद येथील एचपी पेट्रोल पंपाच्या समोरील बाजुस करून मणिहार हे निघाले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना धारदार शस्त्राने जखमी केले. त्यांच्याकडील दोन हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेले. करम यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, लोणीकंद पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून व माहिती मिळवून ओंकार आळंदे आणि तानाजी जाधव याला अटक केली आहे. ते दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Sasvad Crime : सासवड येथे कोयत्याने सपासप वार करणार्या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी..