Loni Kalbhor Crime लोणी काळभोर, (पुणे) : पुर्वीच्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करीत गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. १२) वडकीतील फिल्ड गार्ड कंपनीसमोर घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ज्ञानेश म्हेत्रे (वय – २० रा. दिवे, पुरंदर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार प्रणव संतोष निगडे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार….!
प्रणव आणि ज्ञानेश यांचे काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच रागातून प्रणवने त्याच्या आणखी साथीदारांना बोलावून घेतले. कंपनीत कामावरुन सुटल्यानंतर घरी जाण्याच्या तयारीत असताना टोळक्याने ज्ञानेशला बेदम मारहाण करीत जखमी केले. उपचारानंतर ज्ञानेशने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करीत आहेत.