Kolkata News : कोलकाता : फोनसाठी कोण काय करेल, काहीच सांगता येत नाही. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून एका जोडप्याने आपलं बाळ विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या जोडप्याने आपलं आठ महिन्यांचं बाळ विकलं आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुलाच्या आईला अटक करण्यात आली. त्यानंतर मुलाचे वडील जयदेव यालाही अटक करण्यात आली, जो फरार होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पश्चिम बंगालमधील घटना
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या जोडप्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दोन वेळच्या अन्नासाठी देखील त्यांना संघर्ष करावा लागतो. असे असताना अचानक त्यांनी आयफोन विकत घेतला. एवढेच नव्हे तर रील बनवण्यासाठी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला.
जोडप्याच्या अचानक बदललेल्या वागणुकीमुळे शेजाऱ्यांना संशय आला. विशेष म्हणजे शेजाऱ्यांना बाळ न दिसल्याने त्यांनी बाळ कुठे आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान जोडप्याने वेगवेगळी उत्तरे दिली. त्यामुळे संशय दाट झाला. अखेर या दाम्पत्याने पैशाच्या बदल्यात मुलगा विकल्याचे कबूल केले. (Kolkata News) या पैशात त्यांनी रील बनवण्यासाठी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच खारदह परिसरातील एका महिलेकडून बाळाची सुटका करण्यात आली. या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला होता. प्रियंका घोष नावाच्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे.
शेजाऱ्यांचा आरोप आहे की या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील अंमली पदार्थांचे सेवन करते. या जोडप्याला आपली मुलगीही विकायची होती. एका स्थानिक नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे त्यांच्या मुलीलाही विकणार होते. स्थानिक नगरसेवक तारक गुहा म्हणाले की, मुलाची विक्री केल्यानंतर जयदेवने शनिवारी मध्यरात्री मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला. मात्र याबद्दल आम्हाला समजताच आम्ही पोलिसांना कळवले. (Kolkata News) पोलिसांनी जयदेवला अटक केली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolkata News : दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; डबे रुळावरून घसरले
Pune News : फर्ग्युसन महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या..