Khadki Crime : पुणे: सोनसाखळी चोर, पादचाऱ्यांना लुटणारे यांच्यानंतर आता पुण्यात चप्पल चोर आले आहेत. पुण्यातील खडकी भागातील एका दुकानातून तब्बल ५५ चप्पल आणि बूट जोड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
तब्बल ३० ते ४० हजार रुपयांचे ५५ चप्पलांचे जोड लंपास
या प्रकरणी चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांनी मिळून तब्बल ३० ते ४० हजार रुपयांचे ५५ चप्पलांचे जोड लंपास केले आहेत. (Khadki Crime) यातील ४० मेन्स शूज तर १५ लेडीज चपला चोरट्यांनी चोरल्या आहेत.
हरेश आहुजा यांनी या प्रकरणात पोलिसात फिर्याद दिली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी सागर चांदणे, आकाश कपूर, अरबाज शेख यांना अटक केली आहे. (Khadki Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहूजा यांचे खडकी बाजार भागात चपलेचे गोडाऊन आहे. शनिवारी गोडाऊन बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि हाताला दिसेल आणि मिळतील तसे बूट आणि चप्पल असे एकूण 55 चप्पल आणि बूट चोरी करून पसार झाले. (Khadki Crime)
हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे अहुजा यांच्या लक्षात येताच त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अहुजा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. (Khadki Crime)सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Khadki crime : खुन्नसने काय बघतो म्हणत तरुणावर चाकूने वार
Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना