Jejuri News : जेजुरी : दुचाकीस्वाराला अडवून, त्याच्यावर कोयत्याने वार करून, एक लाख रुपये जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शुभम जाधव या आरोपीला सापळा रचून पकडण्यात जेजुरी पोलिसांना यश आले. पिंगोरी येथील शेतामध्ये पोलिसांनी जाधव याला सापळा रचून पकडले.
पोलिसांनी सापळा रचून पकडले
जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव अच्युत शेळके असे असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे पिग्मी एजंट म्हणून ते काम करत होते. याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदपूर (जि. लातूर) येथील पिग्मी एजंट अच्युत शेळके हे ८ डिसेंबर रोजी एजन्सीचे पैसे जमा करून घरी जात असताना, त्यांची दुचाकी अडवून शुभम जाधव याने त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. (Jejuri News) जमा केलेले एजन्सीचे एक लाख रुपये रक्कम घेऊन तो फरारी झाला.
दरम्यान, जेजुरी परिसरातील उंच डोंगरावर असलेल्या पिंगोरी गावातील एका नातेवाईकांच्या शेतात आरोपी लपून बसल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली. (Jejuri News) पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून आरोपीला पकडले.
बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, भोर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, हवालदार दशरथ बनसोडे, प्रशांत पवार, राहुल माने, योगेश चितारे यांच्या पोलीस पथकाने आरोपीस शेतात जाऊन जेरबंद केले.
दरम्यान, शुभम जाधव या आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jejuri News : जेजुरी येथील खंडोबा मंदिराचा गाभारा सोमवारपासून दीड महिना बंद