Indapur News : पुणे : सोन्याचे दागिने, महागड्या वस्तू, वाहनांची चोरी होत असल्याच्या घटना आपण ऐकतो. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे चक्क तलावातील माशांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राच्या तलावातून तब्बल पावणेदोन लाख रुपयांचे वेगवेगळ्या जातीचे मासे चोरीला गेले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंदापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणगाव (ता. इंदापूर) येथील शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राच्या तलावातून तब्बल पावणेदोन लाख रुपयांचे वेगवेगळ्या जातीचे मासे चोरीला गेले.(Indapur News) याबाबत मत्स्य बीज उत्पादन केंद्रावरच कामास असलेले सतीश विक्रम खबाले (रा. महादेवनगर, शहा, ता. इंदापूर), गणेश बंडगर आणि वैभव गणेश बंडगर (दोघेही रा. हिंगणगाव, ता. इंदापूर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सोलापूर विभागाच्या सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रेखा शंकरराव रावणगावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हिंगणगाव येथील शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्राचा अतिरिक्त पदभार घेतेवेळी तलावात असणारे ११५२ किलो मासे, जुलै २०२३ मध्ये तलावात सोडलेले कटला, रोहू आणि मृगल जातीचे ४८ किलो मासे, असे एकूण १२०० किलो मासे सप्टेंबर २०२३ अखेर तलावात होते. (Indapur News) त्यापैकी तब्बल १ लाख ७२ हजार रुपये किमतीचे जवळपास ११५० किलो मासे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरून नेले.
मत्स्य चोरट्याने मत्स्य खाद्यही चोरल्याचे या वेळी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी अक्षय कोकाटे यांची निवड निश्चित
Indapur News : एन. पी. इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – संतोष मोरे
Indapur News : भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अंकिता पाटील-ठाकरे यांची निवड