उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावर केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आरामदायी बसने धडक दिल्याने ४ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर २५ व त्यापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ०१) पहाटे पाच वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील केडगाव चौफुला येथे लक्झरी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात ; दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह ४ जणांचा जागीच मृत्यू ; २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी तर ५ जणांची प्रकृती चिंताजनक…!#pune #BreakingNews #punekar #solapur pic.twitter.com/CBUtbLLCHp
— Pune Prime News (@puneprime_news) February 1, 2023
पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यु झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघाली होती. तर टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर ही बस आदळून अपघात झाला. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली.
जखमींना यवत पोलीस, महामार्ग पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवले आहे.
दरम्यान, या चार मृतांमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीचाही यात मृत्यू झाला आहे. यामुळे तीन पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात