नाशिक : जून २०१३ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या बाफना हत्याकांडाच्या आरोपीना नाशिक न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही आरोपींना विपीन बाफना यांचे अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी ना दिल्याने विपीन बाफना यांची धारधार शास्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेचे आरोपींनी चित्रीकरण देखील केले होते.
धान्य व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा मुलगा असलेल्या विनीत नाशिकमधील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आरोपीनी खंडणीसाठी विपीनचे अपहरण केले करून कुटुंबाकडे खंडणीची मागणी केली होती. बाफना कुटुंबांने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपींनी विपीनची हत्या करून त्याचा मृतदेह आडगाव शिवारात आढळून आला होता.
न्यायालयाने खुनाच्या संदर्भात दोषारोप सादर करताना आरोपीनी काढलेला व्हिडीओ, मोबाईल, सीम कार्ड याशिवाय तांत्रिक बाबींचा देखील समावेश करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी चेतन पगारे व अमन जट या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले असून इतर तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. खुनानंतरच्या आरोपींनी केलेल्या चित्रफितीत दोन आरोपी दिसून आले होते, त्यामुळे हाच खुनासाठी सबळ पुरावा ठरला. या खटल्याचा निकाल दिला जाणार असल्याने आज न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.