Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विकास कामांच्या नावाखाली भ्रष्टाचार करणाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी व ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी जनसेवा पॅनललाच निवडून द्यावे – राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु काळभोर

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 December 2022, 18:48

विशाल कदम

लोणी काळभोर (पुणे) – मतदारांनी मोठ्या विश्वासाने सत्ता दिली असतांना, मागील पाच वर्षाच्या काळात सत्ताधारी पॅनलचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड या दोघांनी मागील पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. अशा भ्रष्टाचारी लोकांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी व ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी जनसेवा पॅनललाच निवडून द्यावे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व “जनसेवा पॅनेल”चे प्रमुख नंदु काळभोर यांनी व्यक्त केला आहे.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथे जनसेवा पॅनेलच्या प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी (ता.१६) पार पडली. यावेळी बोलताना नंदु काळभोर यांनी वरील आवाहन केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधवराव काळभोर होते.

 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, साधना सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर यांच्यासह अरुण काळभोर, सुभाष कदम, बाबासाहेब काळभोर, सुनील कदम, बाळासाहेब कदम, ऋषिकेश काळभोर, देविदास कदम, प्रितम काळभोर, निलेश काळभोर, सचिन काळभोर, पांडा काळभोर, बाळासाहेब गायकवाड, शरीफमामु खान, सुरेश गायकवाड, राजाराम दळवी, योगेश घुले, विजय थोरात, शेखर काळभोर, सुरेश चांदणे, जयसिंग घाडगे, दिलीप दोडके, सुशील काळभोर, अश्वित काळभोर, विलास कदम, प्रदीप गुजर, जयशिंग चंद, दादा चिंतामण घाडगे, पांडुरंग कदम, संजय चांदणे, नितीन टिळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना नंदू काळभोर म्हणाले, सत्ताधारी मागील पाच वर्षात सव्वाशे कोटींची विविध कामे केल्याचा ढोल वाजवीत आहेत. मात्र झालेली बहुतांश कामे आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून झाली आहेत. मात्र ”खोटे बोल पण रेटून बोल” या स्वभावानुसार चित्तरंजन गायकवाड ही कामे आम्हीच केली म्हणत आहेत. सव्वाशे कोटींची विकास कामे केली असे शांगत असतानांच, त्यांनी केलेला भ्रष्टाचार जनतेसमोर येऊ लागल्याने, त्यांना निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. आमचे निवडणुकीत उतरलेले सर्व उमेदवार पाहता आमचा विजय निश्चित आहे. मतदार राज्या भ्रष्ट प्रवृत्तीला साथ देणार नसल्याने जनसेवा पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार कल्पना काळभोर यांच्यासह सर्व १७ उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असला विश्वासही नंदु काळभोर यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी बोलतांना युवा नेते प्रतिक काळभोर म्हणाले, मागील पाच वर्षात विकासाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. कोविडच्या काळात कित्येक लाखांचा भ्रष्टाचार झालेला आहे. पाणीपुरवठा योजना मंजुर कोणी केली व त्याचे ढोल कोण वाजवते हे न कळण्याइतपत मतदार भाबडा नाही. आमदार अशोक पवार, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, माजी उपसरपंच ऋुषी काळभोर आदींनी पाणीपुरवठा योजना मंजुंर करण्यासाठी प्रयत्न केले होते. ग्रामपंचायतीचा विकास व ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना सन्मान यासाठी आम्ही कटीबध्द असुन, जनतेने आपल्या अंतरमनाचा कौल घेऊन आमच्या पॅनेलला निवडुन द्यावे असे आवाहनही प्रतीक काळभोर यांनी यावेळी केले.

दरम्यान, या सभेत पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा स्मिता नॉर्टन, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, जेष्ठ नेते गणपत चावट, दत्ता आंबुरे, प्रतिक काळभोर यांनी भाषणे केली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश काळभोर यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुक- मतदारांना ग्रामपंचायतीचा सर्वागिण विकास हवा असल्याने, मतदारराजा नवपरीवर्तन पॅनेललाच भरघोष मतांनी विजयी करणार- चित्तरंजन गायकवाड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.