Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वीज समस्या सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण; राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 December 2022, 18:26

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील निवासी आणि औद्योगिक पट्टयातील वीज समस्या सोडवण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, उद्योजकांसह सर्वसामान्य नागरिकांना अखंडित वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पाभाभूत सुविधा सक्षम केल्या जाणार आहेत, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार लांडगे यांनी मुंबईत भेट घेतली. त्यावेळी भोसरी मतदार संघातील वीज समस्या सोडवण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदार संघात औद्योगिक आणि निवासी अशा दोन्ही पट्टयातील वीज ग्राहकांना नियमितपणे वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून, त्या तुलनेत वीज यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नाही. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही विकासकामे तात्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडे खालीलप्रमाणे कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास सदर कामे मार्गी लावता येतील.

आमदार लांडगे म्हणाले की, सफारी पार्क मोशी अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे ८० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. मोशी, डुडुळगांव, आकुर्डी, चिखली, तळवडे या भागातील औद्योगिक व निवासी पट्टयातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. चऱ्होली अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भोसरी, चऱ्होली, दिघी, धानोरी या भागात पुरेशा दाबाने वीज पुरवठा करणे सुलभ होणार आहे. यासह भोसरी गावठाणे येथील नवीन स्विचिंग उपकेंद्र, भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत ओव्हरहेड वीज वाहिन्याचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करणे सवस्तिर योजना राबवणे, तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फिडर बे व भूमिगत काम तातडीने करण्याची योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, निधी उपलब्ध करुन कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.

 

भोसरी उपविभागाची पुनर्रचना…
भोसरी विभागांतर्गत भोसरी एमआयडीसी तसेच सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. औद्योगिक, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी कुशल प्रशासकी नियंत्रणासाठी भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग करणे गरजचे आहे. नवीन उपविभाग स्थापन केल्यास खालीलप्रमाणे पुनर्रचना प्रस्तावित आहे. त्यामुळे भोसरी उपविभाग क्र. १ चे विभाजन करुन भोसरीगांव शाखा कार्यालय, नाशिकरोड शाखा कार्यालय, चऱ्होली शाखा कार्यालय निर्माण करण्यात येईल. तसेच, भोसरी उपविभाग क्र. २ चे विभाजन करुन इंद्रायणीनगर शाखा कार्यालय आणि मोशी शाखा कार्यालय प्रस्तावित आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

नाशिक हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.