Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार सोन्या घायळ व अविनाश कामठे अखेर जेरबंद; शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून झाले होते फरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 January 2025, 11:55

लोणी काळभोर: जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरात सोमवारी (ता. 23 डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सोन्या घायळ व त्याचा साथीदार अविनाश कामठे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देत होता. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सोन्या घायळला सासवड येथील पुरंदर सिटी परिसरातून बुधवारी (ता.8) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. तर अविनाश कामठे याला लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.

 

सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ (वय-29, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली) व अविनाश कामठे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या अगोदर लोणी काळभोर पोलिसांनी गणेश गोडसे व श्रीकांत मेमाणे यांना अटक केली आहे. याप्रकरणी विजय श्रीरंग काळभोर (वय-46, रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय काळभोर हे शेतातील पोल्ट्री फॉर्ममध्ये सोमवारी काम करीत होते. तेव्हा तेथे आरोपी सोन्या घायाळ व त्याचे साथीदार मोटार सायकल वरुन आले. सोन्या घायाळने फिर्यादी विजय काळभोर यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच सोन्या घायाळच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व दगडांनी काळभोर यांना मारहाण केली.या मारहाणीत विजय काळभोर हे जखमी झाले होते.

याप्रकरणी विजय काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन्या घायळ व त्याच्या तीन ते चार साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम 109,118 (2),189 (2),189 (4) 190, 352, 351 (3) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142, 37 (1) (3) सह १३५ व क्रिमिनल लॉ. आर्म अक्ट कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सोन्या घायळ व अविनाश कामठे हा फरार झाला होता.

सोन्या उर्फ निखिल घायाळची गुन्हेगारी पार्श्वभूमी

दरम्यान, सोन्या उर्फ निखिल घायाळ याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कायद्याचा वाचक बसावा म्हणून पोलीस प्रशासनाने तडीपार सुद्धा केले आहे. मात्र त्याची गुन्हेगारीवृत्ती अद्यापही थांबलेली नाही. त्याच्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व त्याची गुन्हेगारी मोडीत काढून आरोपीला पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांची पथके तयार केली होती.

सदर पथके ही सोन्या घायळ व अविनाश कामठे याच्या मागावर होती. आरोपीचा तपास करीत असताना, पोलिसांना आरोपी सोन्या घायळ हा सासवड येथील पुरंदर सिटी परिसरात येणार आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपी सोन्या घायळला मोठ्या शिताफीने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. तर अविनाश कामठे यालाही पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार केतन धेंडे, गणेश सातपुते, चक्रधर शिरगिरे, तेज भोसले, दिगंबर जगताप यांच्या पथकाने केली आहे

आरोपींना ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

मुख्य आरोपी सोन्या घायळ व त्याचा साथीदार अविनाश कामठे यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाकडून ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने ॲड प्रणव माटे, ॲड रुतुराज पासलकर आणि ॲड पुष्कर पाटील यांनी काम पहिले.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5 नराधम, 1 तरुणी! मित्राला दोरखंडाने बांधून तरुणीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांनी 8 दिवसांनंतर नराधमांची नावं केली जाहीर; कोणाला वाचवण्याचा सुरु होता प्रयत्न

Sunday, 5 April 2026, 11:41
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

खानोट्यात जागेच्या वादातून रक्तरंजित थरार; लोखंडी रॉडने डोक्यावर वार, वडील गंभीर जखमी

Sunday, 5 April 2026, 11:24

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

Sunday, 5 April 2026, 11:23

“तुमच्यावर काळी जादू केलीये” मायलेकीला विवस्त्र केलं अन् फार्महाऊसवर भोंदूबाबाने केलं अघोरी कृत्य

Sunday, 5 April 2026, 11:21

बापरे! तिने जीवापाड प्रेम केलं, पण त्याने म्हटलं ‘टाईमपास’; प्रियकराच्या एका शब्दाने पुण्यात तरुणीने संपवलं आयुष्य

Sunday, 5 April 2026, 11:10

बापरे! नाशिकमध्ये पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 10:43
Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपची तयारी, मोठ्या विजयासाठी सदस्य नोंदणी अभियान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.