Cyber Crime पिंपरी-चिंचवड : सायबर चोरीच्या माध्यमांतरून शहरातील अनेक नागिकांची फसवणूक होत आहे. अशातच एकाची सव्वा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्रेडिट कार्ड बंद करण्याचा बहाणा करत सायबर चोरट्याने (Cyber Crime ) एका व्यक्तीची तब्बल 1 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
हा प्रकार वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस…
हा प्रकार वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आला आहे. कार्ड बंद करण्यासाठी या व्यक्तीने गुगलवर बॅंकेचा नंबर सर्च केला व मिळालेल्या नंबरवर संपर्क केला यावेळी सायबर चोरट्याने ओटीपी पाठवला तो ओटीपी या वक्तीने शेअर केला असता त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसात धाव घेतली व तक्रार दाखल केली.
चेतन रवींद्र वाणी (वय 35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्टेट बँक ऑफ मॉरिशस या बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले आहे. ते कार्ड बंद करण्यासाठी त्यांनी गुगलवर बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधला. त्यावर संपर्क केला असता फोनवरील व्यक्तीने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी फिर्यादीस एक ओटीपी पाठवला. ओटीपी शेअर करताच फिर्यादीच्या बँक खात्यातून 1 लाख 32 हजार 858 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.
चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune News : वाहतूक नियमन सोडून वसुली करणे पडले चांगलेच महागात ; पोलीस कर्मचारी निलंबित
Pune News : सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का;आताया सोनूचीच ,सोशल मीडियावर हवा
Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड