Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील तरुणी मधुरा कुंजीर यांची गगनभरारी ; भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर घेतली गरुडझेप, महाराष्ट्रातील एकमेव तरुणी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 March 2023, 14:06

विशाल कदम 

(Uruli Kanchan News ) उरुळी कांचन :  जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हेच उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मधुरा संतोष कुंजीर हिने सिद्ध करून दाखविले आहे. मधुराने भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदाला गवसणी घालून गरुडझेप घेतली आहे. तिने मिळविलेल्या यशाचे पुरंदर, हवेली व दौंड तालुक्यातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

UPSC परीक्षेत यश

इंडियन मिलिटरी अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी आणि इंडियन एअर फोर्स अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (Union Public Service Commission) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (combined defence services)घेतली जाते. या परीक्षेत मधुरा ११ वी रँक मिळवली असून तिची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदासाठी महाराष्ट्रातून एकमेव निवड झाली
आहे.

 

मधुरा कुंजीर यांचे मुळगाव वाघापूर (ता. पुरंदर) आहे. मधुरा यांचे वडील संतोष कुंजीर हे पुरंदर तालूका शिक्षक पतसंस्थेचे संचालक तर आई स्वाती कुंजीर ह्या मुख्याध्यापिका आहेत. मधुराचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूलमध्ये झाले. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मधुराने उरुळी कांचन केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला होता.

त्यानंतर मधुराने बारावीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून पूर्ण केले. तिने बारावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळविले होते. इंजीनियरिंग क्षेत्राची आवड असल्याने तिने जेईई. ॲडव्हान्स परीक्षा दिली. आणि त्याही परीक्षेत तिने यश मिळविले. पुढे तिने पुणे येथील पी आय सी टी कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स पदवी पूर्ण करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.

दरम्यान, मधुराला लहानपणापासूनच सैन्य दलात अधिकारी होण्याची स्वप्न आजी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सिंधुबाई कुंजीर व आजोबा कै. सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण कुंजीर यांच्याकडून प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून देशसेवा करण्याची प्रबळ इच्छा
मधुराच्या मनात तयार झाली. आणि तिच्या स्वप्नांना व इच्छांना बळ देण्याचे काम तिचे चुलते शिक्षक रमेश कुंजीर व चुलती शिक्षिका मनिषा कुंजीर यांनी केले आहे.

भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदासाठी महाराष्ट्रातून एकमेव तरुणी म्हणून मधुराची निवड झाली आहे. मधुरा आता चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षणासाठी गेली आहे. प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आव्हान एक मुलगी म्हणून तिने स्वीकारले आहे. आणि ती लवकरच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर काम करताना आपल्याला लवकरच दिसणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश!

Pune Crime News : पत्नीने घटस्फोटाची मागणी करताच चिडलेल्या पतीने १० दुचाकी आणि चारचाकी गाड्या दिल्या पेटवून

Uruli Kanchan Crime : लोणी काळभोर पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ उरुळी कांचनचे ग्रामस्थ आक्रमक ; गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी!

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33
Next Post

Baramati Crime : खांडज येथील गोबरगॅसच्या टाकीमध्ये पडून एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ, मुलगा आणि शेजाऱ्याचा मृत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.