Big News : पुणे : तब्बल १५ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी चेन्नईहून अटक केली. ललित पाटीलच्या चौकशीमधून अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत हे. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले की, ‘आता ललित पाटील हाती आला आहे. त्यातून एक मोठे ड्रग्जचे जाळे बाहेर येईल. शिवाय यामुळे अनेकांची तोंडेही बंद होणार आहेत.’
ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच दिले
पोलिसांना ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आम्ही यापूर्वीच दिले होते. त्यानुसार पोलीस दलाचे सर्व युनिट कामाला लागले आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांना नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक असे काम करतात त्यांच्यावरही धाड टाकण्यात आली. (Big News) आता ललित पाटील हाती आला आहे. त्याच्या चौकशीतून एक मोठे ड्रग्जचे जाळे बाहेर येईल. काही गोषष्टी मी योग्य वेळी माध्यमांना सांगेन. ललित पाटील सापडला आहे. तो काय बोलतो यापेक्षा ड्रग्जचे रॅकेट बाहेर येणार आहे, त्यावरून अनेकांची बोलतीच बंद होणार आहे.
गुन्हेगारांच्या मुदत वाढवून दिल्याचा आणि चुकीची प्रमाणपत्रे तयार केल्याचा आरोप ससून रूग्णालयावर आहे. या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नाही. (Big News) सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : जागतिक पातळीवरील महागाईचा धोका; खाद्यवस्तूंसह इंधन दरवाढीचे बसणार चटके?