Big News : मुंबई : ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील यांला मुंबईतील न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याचा ताबा मिळावा, यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई येथील न्यायालयात अर्ज केला होता. ललितसह शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित या आरोपींचा देखील ताबा मिळवा, असे अर्जात नमूद केले होते. आज सकाळपासूनच पुणे पोलीस ललित पाटीलचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला आहे.
आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेतले
शिंदे तसेच चौधरी या आरोपींचा ताबा देखील पुणे पोलिसांना मिळाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयात असताना मला पोलिसांनी मारहाण केली होती. माझ्या कानाला आणि बरगडील दुखापत झाली होती. पुणे पोलीस ताबा घेतल्यानंतर मला मारहाण करू शकतात, अशी माहिती ललित पाटील याने कोर्टासमोर दिली होती. (Big News ) त्यामुळे ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आज अखेर पुणे पोलिसांचा ललित पाटीलला ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अऱ्हाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेऊन त्यांची पुणे पोलिसांनी न्यायालयीन कोठडी घेतली आहे.(Big News ) त्यामुळे ज्या आरोपींच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेऊन न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे, त्यांना ललितला अटक झाल्यानंतर पुन्हा समोरा-समोर चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच पुणे पोलिसांच्या तपासात ललितकडून अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट किंवा गुन्ह्यातील अनेक महत्त्वाच्या घटना समोर येवू शकतात.
या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी केलेला तपास हा ललितच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललितच्या साथीदारांसह तिच्या मैत्रिणींना पोलिसांनी अटक केली आहे.(Big News ) ललितचा ताबा मिळाल्यानंतर त्याला कोण मदत करत होते? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश आहे? या सर्व बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
(बातमी अपडेट होत आहे.)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक