सागर जगदाळे
Bhigwan Crime | भिगवण : ‘कानून के हात लंबे होते’ या डॉयलॉगप्रमाणे गेल्या दीड वर्षांपासून गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपीला अखेर भिगवण पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
रवींद्र उर्फ राजू भगवान भदर (वय २७ वर्ष, रा. भिगवण ता. इंदापुर जि.पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जुन्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी पाईप, लाकडी बॅट व लाकडी स्टंप अश्या हत्याराने एकाला गंभीर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपाखाली आरोपी भदर याच्यासह त्याच्या साथीदाराच्या विरोधात वैष्णव राहुल अनपट (वय २५ वर्ष,रा.तक्रारवाडी, ता.इंदापूर, जि.पुणे ) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ठावठिकाणा सतत बदलत पोलिसांना गुंगारा…
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ गुन्ह्यातील दोन आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आले. मात्र आरोपी भदर हा गेल्या दिड वर्षांपासुन त्याचा वेश भुशा व राहण्याचा ठावठिकाणा सतत बदलत पोलिसांना गुंगारा देत होता.
गुन्हे शोध पथकाला आरोपी हा पडवी (ता. दौड) येथे लपुन छपुन राहत असलेलेचे माहिती मिळाली, त्यानुसार सदर आरोपीला छापा घालून ताब्यात घेतले.आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपी पोलीस कस्टडी दिली आहे.
ही कामगीरी भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अमलदार सचिन पवार, रणजित मुळीक, महेश उगले, अंकुश माने, हसिम मुलानी यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Bhigwan News : मदनवाडी चौफुला येथील ड्रेनेज लाईनवरील झाकणे तुटली : अपघात होण्याची शक्यता
Bhigwan News : हरवलेले तब्बल ६ लाखांचे ३२ मोबाईल भिगवण पोलिसांनी केले परत..!