Baramati Crime – बारामती, (पुणे) : तू मला आवडते असे म्हणून एका २२ वर्षीय तरूणीसोबत लगट करून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (ता. ०६) सकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास बारामतीत घडली आहे. (Baramati Crime) याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Baramati Crime)
बारामती शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल..
अरफाज सादिक आत्तार (रा. कोष्टी गल्ली, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आरोपी अरफाज हा फिर्यादी तरुणीचा पाठलाग करीत होता. यावेळी बंगल्याचे दरवाजे जवळ जाऊन फिर्यादीस बाहेर बोलून घेऊन तू माझ्याबरोबर चल असे म्हणून तिचा डावा हात पकडला. हात ओढून बंगल्याच्या गेटच्या बाहेर फरपटत गेटच्या बाहेर नेऊन माझ्याशी लग्न कर असे म्हणून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, तिच्या गालावरून हात फिरवीत तू मला आवडते असे म्हणून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच सदर तरुणीला ढकलून दिल्याने तिच्या गुडघ्याला जबर जखम झाली आहे. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद सदर तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात अराफाज आत्तार याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :