Samriddhi Highway Accident : वाशीम : समृद्धी महामार्गावरून कांदे घेऊन निघालेला ट्रक महामार्गावरुन खाली कोसळून ट्रकला आग लागल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक व क्लिनरचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २०) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास वाशीम जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. (Samriddhi Highway Accident)
संभाजीनगरवरून पश्चिम बंगालसाठी निघालेल्या ट्रकला समृद्धी महामार्ग लोकेशन १७८ दोन कारंजाजवळ चालकाला डुलकी आल्यामुळे ट्रकचा भीषण अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. (Samriddhi Highway Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक समृद्धी मार्गाच्या मधोमध असलेल्या पुलाचे कठडे तोडून खाली कोसळला. कठड्याला घर्षण झाल्यामुळे डिझेलची टॅंक फुटून ट्रकने भीषण पेट घेतला. यात दोघांचा भाजून मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा बलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अग्निशामक दल आणि कारंजा शहर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. (Samriddhi Highway Accident)
दरम्यान, शहर पोलीस स्टेशन कारंजा आणि अग्निशामक दल कारंजा हे घटनास्थळी दाखल झाल्यावर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आग एवढी भीषण होती की ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. त्यामध्ये असलेले चालक आणि क्लीनर हेही जळून जागी ठार झाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास लागले. ट्रकला लागलेली आग ही एव्हढी भीषण होती की दोन किमीवरून दुराचे लोट दिसत होते. (Samriddhi Highway Accident)