पुणे : खराडी परिसरातील सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने २७ वर्षीय तरुणीवर शरीर संबंध ठेवून त्यातून ती गर्भवती राहिल्याने तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
राकेश अंकुश विटकर (वय २३ वर्ष, रा. आपले घर सोसायटी जवळ, सर्यप्रकाशनगर, खराडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकणी एका २७ वर्षीय तरूणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, खराडी परिसरात राकेश हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तिथेच राहणाऱ्या एका फिर्यादी मुलीशी त्याची मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढून शरीर संबंध निर्माण झाले. त्यानंतर फिर्यादी गर्भवती राहिली असता, ही गोष्ट आरोपीला समजताच त्याने जबरदस्तीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. तरुणीच्या मनाविरुद्ध हा प्रकार घडला. त्यामुळे त्या दोघांत वाद झाले.
दरम्यान, तरुणीला हा आघात सहन न झाल्याने तिने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा तपासासाठी येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
त्यानुसार राकेश अंकुश विटकर या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.