पुणे : शिवाजीनगर-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावर एलआयसी ऑफिससमोर एका भरधाव मोटार चालकाने सहा ते सात वाहनांना धडक दिल्याने तीन ते चार व्यक्ती जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ०१) सायं. साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोटारचालक योगेश नवाळे (वय २५, रा. पठारे वस्ती, खराडी बायपास) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नवाळे हा मद्यप्राशन करून मोटार चालवित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघातामुळे काही वेळ रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.