नागपूर : नागपुरातील परडी परिसरात जवळच्या मित्राने केलेली मस्करी सहन न झाल्याने मित्रालाच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जितू राजू जयदेव असे मृताचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव इतवारीदास आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितू आणि इतवारीदास हे जुने मित्र असून दोघेही मजुरीचे काम करतात. सर्वजण गार्डनजवळ बसून गप्पा-गोष्टी करीत असताना गंमतीत मित्रांनी इतवारीदासचा मोबाईल लपवला. आपला मोबाईल पाहिला असता तो मिळाला नाही त्यामुळे इतवारीदासचा पारा चांगलाच चढला. त्याने रागाच्या भरात येऊन जितूच्या डोक्यावर लाकडी दांडाने वार केले. या भीषण हल्ल्यात जितूचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परडी पोलिसांनी आरोपी इतवारीदासला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान मोबाईल लपवल्यावरून सुरू असलेल्या टिंगल-टवाळीचे रुपांतर वादात होऊन जिवलग मित्रालाच मस्करी सहन न झाल्याने संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.