हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल बापु शेलार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे जिल्हा युवक सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्ह्याची बैठक नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे या ठिकाणी पार पाडली.
यावेळी या कार्यक्रमात विशाल शेलार यांना हे पत्र देण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विकास कदम, पश्चिम महाराष्ट्र युवक संपर्क प्रमुख बापूसाहेब गायकवाड, जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, पुणे जिल्हा सरचिटणीस संदिपान कडवळे, माजी कार्याध्यक्ष विक्रम शेलार, महिला अध्यक्ष मालन बनसोडे, पुणे जिल्हा युवकाध्यक्ष प्रविण ओव्हाळ, हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे, हवेली महिला अध्यक्ष नेहा चव्हाण, अभिजित पाचकुडवे व सर्व तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते.
निवडीनंतर विशाल शेलार म्हणाले, ” फुले, शाहु, आंबेडकरांचे व आठवले साहेबांचे विचार घरोघरी पोहोचविणार तसेच हवेली तालुक्यामध्ये पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सर्वधार्मिय युवकांना सोबत घेऊन काम करणार आहे.”