नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात आता या दरात वाढ झाल्याचे पाहिला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळे मंगळवारी स्थानिक बाजारात सोन्याचा भाव 550 रुपयांनी वाढून 75,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने अनुक्रमे 75,700 रुपये आणि 75,350 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. स्थानिक ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांची देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.
याशिवाय चांदीचा भावही 400 रुपयांनी वाढून 94,400 रुपये किलो झाला. गेल्या सत्रात तो 94,000 रुपये किलोवर बंद झाला होता. व्याजदर कपातीच्या अपेक्षेने सोने आणि चांदीच्या दरात मोठी सुधारणा दिसून आली.
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 73,050 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत थोड्याशा फरकाने जास्त होताना दिसत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 67,610 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 93,500 रुपयांवर गेले आहेत.
दरम्यान, सोने-चांदीचे दर कमी असो वा जास्त त्याची खरेदी करणारा एक विशेष असा वर्ग आहे. सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवावी लागते.