मुंबई : विऱोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत पुण्यातील पोर्श अपघाताचा मुद्दा उपस्थित केला, तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर आगपाखड सुद्धा केली. पुण्यातील पोलीस प्रशासन काय काम करत आहे? पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करुन त्यांची चौकशी करण्यात यावी. असे अंबादास दानवे यांनी विधानोपरिषदेमध्ये म्हटले आहे.
मात्र, यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमितेश कुमार यांची पाठराखण केल्याचे दिसून आले. फडणवीस यांनी अंबादास दानवे यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आणि अमितेश कुमार यांचा बचाव केला. पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी कोणाचे ऐकून पुणे पोलिस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करु नये, असे फडणवीस यावेळी बोलले.
पोर्श अपघातप्रकरणाची जर टाईमलाईन समजून घेतली तर सर्व समजून येईल. काही अधिकाऱ्यांना सवय आहे की, एखादा अधिकारी डोईजड झाला की, कोणाला तरी पकडून पत्र लिहायचे. पोर्श अपघात प्रकरणात 8 वाजून 13 मिनिटांनी एफआयआर नोंदवण्यात आला. साडेदहा वाजता त्याठिकाणी वरिष्ठ अधिकारी आहे. त्यांनी कलम 304 लावण्याचे आदेश दिले. हे प्रकरण न्यायालयासमोर आले तेव्हा पोलिसांनी मागणी केली की, आरोपीला सज्ञान म्हणून पाहा. बालहक्क न्यायालयाने निबंध लिहण्याचे निर्देश दिले होते. त्यावरही पोलिसांनी हरकत घेतली. त्यानुसार कोर्टात याचिका केली. यानंतर आरोपीची रवानगी कोठडीत झाली, असे फडणवीस यांनी दानवेंच्या आरोपावर उत्तर देताना सांगितले.
या प्रकरणात मला कोणालाही क्लिन चीट द्यायची नाही. पण पुणे पोलिसांनी चांगली कारवाई केली. एका पीआयवर कारवाई केली कारण त्या मुलाची मेडिकल आधी करायची होती. पुणे पोलिसांनी रक्ताचे नमुने नुसार DNA प्रोफाईलिंग मळे एका मिनिटात कळाले की ते रक्त त्या आरोपी मुलाचे नव्हते. डॉ. तावरे यांचे WhatsApp ट्रॅक केले आणि सर्वांवर कारवाई केली. ती गाडी रजिस्टर नव्हती म्हणून त्यासंबंधी कारवाई करण्यात आली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
AI CCTV कामात जर कोणी ब्लॅक मेल केले तर..
जळगावची घटना घडली ती पुणे प्रकरणाच्या आधी घडले होते. पण जळगाव प्रकरणातील गाडीत असणाऱ्या लोकांना खूप मारले होते. त्यामुळे तिथे पोलिसांना कारवाई उशीरा करावी लागली. पुणे पोर्श गाडीवर कारवाई करणे गरजेचे होते त्यानुसार कारवाई केली गेली आहे. पुणे पोर्श अपघातानंतर सुप्रीम कोर्टात AI CCTV कॅमेऱ्यांबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. नियमांच्या अंतर्गत AI CCTV कॅमेरे बसवले आहेत. या AI CCTV कामात जर कोणी ब्लॅक मेल केले तर त्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
ससून रुग्णालयातील डॉ. तावरे सक्तीचा रजेवर नव्हत तर त्यांचा विक ॲाफ होता. या प्रकरणी ३ डॅाक्टरसहित अनेकांवर कारवाई केलीये. ससूनच्या संदर्भात अनेक घोटाळे समोर आले. ससून हॅास्पिटलचे ओव्हर ॲाल रिव्ह्यू ॲाडिट करणे गरजेचे आहे, ते केले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जामिनाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात : देवेंद्र फडणवीस
पुणे हिट अँड रन प्रकरणात राज्य सरकार आरोपीच्या जामीन विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे. एक-दोन दिवसांत तारीख मिळण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये नियमावली कडक केलेली आहे. पब्जमध्ये जाणारा व्यक्ती 18 वर्षे पूर्ण केलेला आहे का, हे तपासूनच सोडण्यात येईल. यासोबतच पब्जमध्ये देण्यात येणाऱ्या बाबी या अल्पवयीन व्यक्तीला दिल्या जात नाहीत, याची देखील आता सीसीटीव्हीच्या द्वारे देखरेख केली जाणार आहे. हॉटेल व्यवसायिकांना तो डेटा ठेवावा लागेल. कारण पोलीस कधीही त्यांना तो डेटा मागू शकतात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.