इंदापूर : तालुक्यातील मौजे बेलवाडी येथे आज सोमवारी (दि.8) रोजी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील पहिले गोल रिंगण सोहळा टाळ-मृदंगाच्या गजरात लाखोच्या उपस्थित संपन्न झाला.
पालखीचे आगमन होताच बेलवाडीच्या सरपंच मयुरी जामदार, उपसरपंच नामदेव इथापे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी वैभव नाडवडकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संदीप राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, रतीलाल चौधर, तलाठी कांबळे, महावितरणचे मधुकर साळवे, मोहन सुळ, भुजबळ माने, प्रशांत गवसने, विशाल गावडे, नेचर उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जुनराव देसाई, कांतीलाल जामदार, सर्जेराव जामदार, शहाजी शिंदे, अमोल भोईटे, शरद जामदार, लक्ष्मण खैरे, माणिक जामदार, रामभाऊ यादव, अनिल खैरे, विजय पवार, संजय पवार, बबनराव जामदार, राजेंद्र पवार, प्रताप पवार, हनुमंत खैरे, अनिल दुगड, अशोक जामदार, अंकुश जामदार, सर्जेराव काळे, चंद्रकांत शितोळे, ज्योतिराम जामदार, हनुमंत यादव, पंकज जामदार, पूजा भिसे, डॉ. योगिता खुटाले, सुजित गायकवाड, डॉ. ज्योती राम जामदार, सुनिल देसाई, बाळासो पवार, सागर भिसे, सुरेश भिसे, वायरमन रोहिणी कराड, ज्योती कनल्हवार, सचिन भिसे, प्रकाश खैरे, प्रकाश शेळके, अक्षय भिसे, महेश भोसले, चिमा जामदार, दत्तात्रय घाडगे, बाळासो गायकवाड, महादेव गायकवाड, किरण भोसले, राजेंद्र गायकवाड, तसेच ग्रामसेवक मुगेंद्र कर्चे, महिपती यादव आदींसह सर्व विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, बालाजी मेडिकल स्टोअर्स बेलवाडी यांच्या वतीने हजारो वारकऱ्यांना मोफत गोळ्या आणि औषध वाटप करण्यात आले. तर हिराबाई हरिभाऊ देसाई हायस्कूलच्या वतीने आलेल्या सर्व वारकऱ्यांना चहा वाटप करण्यात आले. पालखी मैदानावर छत्रपती हायस्कूलचे शिक्षक परशुराम घाडगे यांनी सुरेख रांगोळी काढली होती. तसेच हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडीच्या विद्यार्थिनींदेखील पालखी तळावर आकर्षक रांगोळी काढली होती. दोन्ही रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
पालखी सोहळा रिंगण पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेलवाडी गावातील भजनी मंडळी यांनी मारूती मंदिरात पालखी समोर भजन, अभंग आणि आरती केली.