बारामती : महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी तीन दावेदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, दुसरे मुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांना आपण मुख्यमंत्री व्हावे असे वाटते.
दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले की, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती पूर्ण होवो, असं सुनेत्रा पवार म्हणाले.
बारामतीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागत कार्यक्रमात राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महायुतीचा चेहरा कोण असेल, हे सध्या तरी स्पष्ट होत नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील, असं सांगितले जात होते.
मात्र लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील भाजपच्या बैठकीत निवडणुका एकत्र लढू, असे सांगण्यात आले. अशा स्थितीत महायुतीचा चेहरा कोण? अद्याप निश्चित झालेले नाही, महायुतीतील तिन्ही नेते आपापल्या पक्षातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित आहे, असं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या