पुणे : पुण्यातील तब्बल १६५ ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनीच याबाबत माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने संवेदनशील असलेले हे ‘हॉटस्पॉट’ शोधून काढले आहेत. यामध्ये शिवाजीनगर, पर्वती, बिबवेवाडी, हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या ठिकाणी ही असुरक्षित असून शहरातील पाच झोनमध्ये सर्वाधिक संवेदनशील ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखले गेले आहेत.
महिलांच्या सुरक्षा संदर्भात राज्य सरकारने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व पोलीस दलांना २०१५ साली महिला सुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २०१५ साली ‘महिला सुरक्षा समिती’ स्थापन करण्यात आली.
या समितीमार्फत शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल, निर्जन स्थळे, बागा, महाविद्यालयांचे परिसर, शाळांचे परिसर, कामाची ठिकाणे, बस व रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, जीम आदी ठिकाणी असणाऱ्या सुरक्षेची नियमित पाहणी आणि त्यावर लक्ष ठेवण्याचे काम हि समिती करते.
म्हणून ही ठिकाणे असुरक्षित
या भागांमध्ये रस्ते, बस स्टॅाप अशा वर्दळीच्या ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था नाही. उशीरा प्रवास करतात तिथे योग्य ती व्यवस्था नाही. रोड रोमिओंचा वावर याठिकाणी आहे. अवैद्य धंदे देखील या परिसरांमध्ये सुरु असून देशी दारूच्या दुकानांजवळ बस स्टॉप आहेत. अशा विविध कारणांमुळे ही १६५ ठिकाणे असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित?
- खडक पोलीस ठाणे हद्दीतील 4 ठिकाणे
- समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील 6 ठिकाणे
- फरासखाना पोलीस ठाणे हद्दीतील 6 ठिकाणे
- विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील 4 ठिकाणे
- शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील 11 ठिकाणे
- डेक्कन पोलीस ठाणे हद्दीतील 5 ठिकाणे
- समिती पोलीस ठाणे हद्दीतील 2 ठिकाणे
- स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील 5 ठिकाणे
- लष्कर पोलीस ठाणे हद्दीतील 4 ठिकाणे
- सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीतील 6 ठिकाणे
- भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतील 4 ठिकाणे
- बंड गार्डन पोलीस ठाणे हद्दीतील 5 ठिकाणे
- कोरेगाव पार्कमधील 4 ठिकाणे
- वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीतील 2 ठिकाणे
- कोथरूड पोलीस ठाणे हद्दीतील 2 ठिकाणे
- अलंकार पोलीस ठाणे हद्दीतील 4 ठिकाणे
- पार्वती पोलीस ठाणे हद्दीतील 10 ठिकाणे
- सिंहगड रोड पोलीस ठाणे हद्दीतील 4 ठिकाणे