मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है…’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हिना स्वत: तिच्या आरोग्याबद्दलचे अपडेट नेहमी सोशल मिडियावर शेअर करत असते. दरम्यान, हिनाची पहिली केमोथेरपी झाली आहे, ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिच्या शरीराच्या काही भागांवर भाजलेल्या खुणा दिसत आहेत. केमोथेरपीनंतर या खुणा शरीरावर दिसत असतात.
View this post on Instagram
या फोटोसोबतच हिनाने एक पोस्टही लिहिली आहे. केमोथेरपीनंतर हिनाच्या शरीरावर अनेक काळे डाग दिसून येत आहेत. या फोटोसोबत पोस्टमध्ये हिनाने लिहिलं आहे की, “या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय? माझ्या अंगावरचे डाग की डोळ्यातील आशा? डाग माझे आहेत, मी त्यांना प्रेमाने आपलसं करते कारण ते माझ्या पात्रतेचं, प्रगतीचं पहिलं लक्षण आहेत. माझ्या डोळ्यातील आशा माझ्या प्रेरणेचं प्रतिबिंब आहे, मी काळ्याकुट्ट बोगद्याच्या शेवटचा प्रकाश पाहू शकतेय. मी माझे उपचार योग्यप्रकारे घेत आहे आणि मी तुमच्यासाठीही प्रार्थना करत आहे.”