नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनगरवाडी ग्रामपंचायत हद्दीत गावठी हातभट्टीची दारू चोरून विकणाऱ्या एका महिलेवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (ता. 03) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे.
अनिता विजय मारवाडी (वय 46, रा. धनगरवाडी ता. जुन्नर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 8 हजार 200 रुपये किमतीची एकूण 82 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगरवाडी येथे काही इसम गावठी हातभट्टीची दारू चोरून विकत असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे, महिला पोलीस शिपाई शुभांगी दरवडे, पोलीस शिपाई गोरक्ष हासे सदर ठिकाणी छापा टाकला.
यावेळी अनिता मारवाडी हि महिला पत्र्याच्या घराशेजारील भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विकत असताना दिसून आली पोलिसांनी सदर ठिकाणावरून 8,200 रुपये किमतीची एकूण 82 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून सदर बाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक आदिनाथ लोखंडे हे करीत आहेत.
नारायणगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, पोलीस अंमलदार संतोष कोकणे, पोलीस नाईक आदिनाथ लोखंडे, पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे, गोरक्ष हासे, गोरख केंद्रे, महिला पोलीस शिपाई शुभांगी दरवाडे यांच्या पथकाने केली आहे.