उरुळी कांचन, (पुणे) : आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 साजरा करण्यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील निसर्गोपचार आश्रम येथे मागील तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या 15 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील 10 किमीच्या परिघात 10 हजार व त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सहभाग नोंदवला होता.
योग विभागाच्या प्रमुख डॉ. समृद्धी व्यास आणि सीएमओ डॉ. अमेया देवीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, डॉ. भगवती, श्री वाडेकर, सतीश सोनवणे, तुषार जगदाळे, राहुल मेमाणे यांच्यासह योगाचार्याच्या समर्पित चमूने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र फुरसुंगीसाठी योग सत्र, राष्ट्रीय आयुर्वेद केंद्रातील चंद्र ध्यान आणि बायफ, प्रयामधाम, महात्मा गांधी शाळा, अस्मिता शाळा, अमर एज्युकेशन सोसायटी, यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधीत योग सत्रांनी या प्रवासाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, स्पिका नॅसे फॅब्रिक लिमिटेड, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव, आणि ए.जे. एंटरप्रायझेस यांसारख्या कॉर्पोरेट हाऊसेसनेही निरोगीपणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
झूम ऍप द्वारे आयोजित ऑनलाइन योग सत्रे आणि भोसरीतील नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट सारख्या उल्लेखनीय संस्थांमधून हा प्रसार आणखी वाढला. याव्यतिरिक्त, निसर्गोपचार आश्रमाने उरुळी कांचन येथे योग सत्रांच्या पाच दैनंदिन बॅचचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भगवती यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर तुषार आणि राहुल यांनी योग मुद्रांचे सुंदर प्रात्यक्षिक केले. वाडेकर यांनी उत्साहवर्थक क्रियांचे प्रदर्शन केले.
डॉ. अभिषेक देवीकर, संचालक आणि विश्वस्त सचिव यांनी मेळाव्याज्ञी वैयक्तिक पातळीवर जोडून दिला. योगाचे खेळ, आश्रमातील कर्मचारी आणि त्यांच्या मुलांनी केलेली अप्रतिम योन स्वना, तसेच योगाचार्यांनी योगाचा इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयावरील अभ्यासपूर्ण सत्रांसह, दुपारी अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. योगिक दिनवर्या यांच्यावरील स्किट, सर्वांगीण आरोग्यासाठी योगाचे महत्व यावर प्रकाश टाकणे, उरुळी कांचन येथील महिलांनी शास्त्रीय नृत्य आणि एक मनमोहक योग नृत्य यासह मंत्रमुग्ध करणारे कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
सोरतापवाडी येथील महिलांनी त्यांच्या आकर्षक योगासनांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि अक्षदा युले यांच्या ध्वनी ध्यानाने कार्यक्रमाची सांगता शांततेत झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. एन. जी. हेगडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी ही, संचालक आणि विश्वस्त सचिव डॉ. अभिषेक देवीकर यांच्या सुवद्ध नियोजन आणि नेतृत्वाचा उत्तम दाखला होता.
दरम्यान, प्रवीण कुंभार, सतीश सोनवणे (प्रज्ञासक), शंकर चौधरी (खरेदी कार्यालय आणि एचआर समन्वयक), तसेच समर्पित वैद्यकीय व्यावसायिक-डॉ. अमेया देवीकर यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभले. डॉ. कुआन शहा, डॉ. मौरी, डॉ. वंदिता, डॉ. श्रावणी आणि डॉ. गणेश यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता.