पुणे : घरची परिस्थिती बेताचीच. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो. एक दिवस अचानक आईला त्रास होऊ लागला. आणि असह्य वेदना सुरू झाल्या. तपासणीअंती कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. या आजारातून बरे होण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असून, त्यासाठी तब्बल 6 लाख रुपये मोजावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले अन् पायाखालची जमीनच सरकली.
दिवसभर काबाडकष्ट केल्यावर हाता-तोंडाशी घास येणार, या परिस्थितीत एवढी मोठी रक्कम उभी करणे, आव्हानात्मक काम होते. आईला पुण्यातील सहयाद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने हातभार बिल दिले. त्यावरील 5 लाख 67 हजार रुपयांचा आकडा पाहिल्यानंतर माझी धडकीच भरली. माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे एवढी मोठी रक्कम भरणे मला शक्य नव्हते. दोन दिवस बिल कमी करण्यासाठी सगळीकडे प्रयत्न करत होतो. पण कोठेही यश आले नाही. तुमच्या मेडिकल सेलकडेही प्रयत्न केल्यानंतर 30 हजार रुपये कमी करू, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.
खामगांव (ता. बार्शी) येथील जयवंत मधुकर नाईकनवरे यांनी पाणावल्या डोळ्यांनी ही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. एकीकडे बेताची आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे आईला एका दुर्धर आजाराचे झालेले निदान. अशा कात्रीत नाईकनवरे कुटुंब सापडले होते. मात्र, शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम उभी कशी करायची, हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला होता. नाईकनवरे यांचे कुटुंबीय, नातेवाईकांनी आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, एवढी मोठी रक्कम तत्काळ उभी करणे शक्य नव्हते.
दरम्यान, या परिस्थितीत आपल्याला आता कोण मदत करीत तेव्हा एकच नाव डोळ्यांसमोर आले ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय. ही व्यक्ती माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात देवदूत बनून आली अन् माझ्या आईची रुग्णालयातून सुखरूप सुटका झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात फोन करून नाईकनवरे या कुटुंबाला जेवढी मदत करता येईल. तेवढी मदत करण्यास सांगितली. आणि रुग्णालय प्रशासनाने बिलातून तब्बल 3 लाख रुपयांची सवलत दिली.
एक फोन आला अन तीन लाख रुपयांची सलवत मिळाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटल प्रशासनाची संपर्क करून नाईकनवरे कुटुंबाच्या मदतीला धावून आले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने बिलातून खूप मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे मी आरोग्यदूत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मी गरीब असलो तरी आज खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो. मी ईश्वर पाहिला नाही; माझ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ईश्वरासमान आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या आईला नवजीवन मिळाले!