इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजपच्या मित्र पक्षांकडून आल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटले आहे. माझ्या जीवाला धोका असल्याचे पत्र त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
काय आहे नेमकं पत्रात
महाराष्ट्रात आपल्या युतीचे सरकार योग्य प्रकारे काम करत आहे. परंतु, इंदापूर मध्ये भाजपच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी मेळावे आणि विविध भाषणांमधून माझ्यावर शिवराळ भाषेत वक्तव्य करत असून त्यांनी मला इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिली आहे.
सुरक्षेची चिंता वाटत असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले असून ही बाब गंभीअसून यात तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंतीही हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांना केली आहे.