यवत: येथील आनंदग्राम गृह रचना सहकारी संस्थेच्या निवडणुकीत आनंदग्राम विकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला असून, पॅनेलचे सर्व १९ उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कामाची दखल घेत आनंदग्रामवासीयांनी सत्ताधारी पॅनेलला पसंती दिली असून, या विजयाबद्दल पॅनल प्रमुख बशीर शेख यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून यवत गावात आनंदग्रामची निवडणूक हा चर्चा विषय होता.
आनंदग्राम गृह रचना सोसायटी संस्था यवतमध्ये नावारूपास आलेली गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेच्या २०२४-२९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज संस्थेच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. पॅनल प्रमुख शेरू उद्योग समूहाचे बशीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आनंदग्राम विकास पॅनलने अशोक जाधव यांच्या आनंदग्राम परिवर्तन पॅनलचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालय दौंड येथील पी. शितोळे यांनी काम पाहिले.