राहुलकुमार अवचट
यवत : पुणे शिवसेना उपशहर प्रमुख आणि मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत आप्प्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाख़ाली व अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजीत जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी बहुजन महाआघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अर्चना शहा भिवरे, युवक प्रदेश संघटक महाराष्ट्र करणसिंह मोहिते-हंबिरराव, पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, पुणे शहर अध्यक्ष मयुरेश प्रताप पाटील, समीर ऊर्फ प्रीतम इंदलकर, धनाजी शिंदे, स्वप्नील जाधव, हर्षद मालुसरे, गणी पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब मालुसरे म्हणाले, “संघटना वाढवण्यासाठी दिवसरात्र कार्य करण्यात येईल तसेच मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात जास्तीत जास्त न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे.”