पुणे : ढोल ताशा ही पुण्याची आण, बाण आणि शान आहे. ढोल ताशा संस्कृती ही पुण्याची खास ओळख आहे. पुणेकर सगळे उत्सव ढोल ताशा वाजवून साजरा करतात. राम मंदिराच्या उद्घटानिमित्त उत्सव साजरा करण्यासाठी पुण्याच्या ढोल पथकाने थेट अयोध्या गाठली आणि मंदिरासमोर शिवरायांचा जयघोष करुन ढोल वादन केले त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उद्घाटनाच्या दिवशी मोठे व्यावसायीक, कलाकारांनी अयोध्येत गर्दी केली होती. मात्र अनेक जण अजूनही आयोध्येला जाताना दिसत आहेत.
पुण्यातील एक ढोल पथक अयोध्येत मंदिराबाहेर ढोल वादनाचे ससादरीकरण करत आहे. ढोल वादन सादर करत श्रीरामांना अनोखी मानवंदना देत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याबाबतची माहिती दिनानाथ खोलकर यांनी एक्स अकाउंटवरुन दिली आहे.
दिनानाथ खोलकर या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलय की, “श्रीराम पथक पुणे, यांनी २४ आणि २५ जानेवारीला अयोध्या इथे श्रीराम चरणी वादन सेवा केली, त्यातील हा एक छोटासा भाग.”
श्रीराम पथक पुणे, यांनी आज २५ January २४ ला, अयोध्या इथे श्रीराम चरणी वादन सेवा केली, त्यातील हा एक छोटासा भाग. @aparanjape @Gautaamm @ShefVaidya @Girbane @maheshmkale @sunandanlele @vikramsathaye pic.twitter.com/Xas5lnIqhW
— Dinanath Kholkar (@dinakholkar) January 25, 2024
त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की असंख्य पुणेकर हातात भगवा झेंडा आणि ढोल घेऊन ढोल वाजवत आहेत. त्यांनी पिवळा आणि पांढरा रंगाचा पोशाख परिधान केला आहे. राम मंदिराच्या बाहेर ते ढोलवादन करताना शिवरायांचा जयघोष करत आहेत.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत लिहिले की, “मला असे वाटते की जणू मंदिराच्या आतमध्ये श्रीरामाचा राज्यभिषेक होत आहे आणि बाहेर प्रजा उत्सव साजरा करत आहे”.