पनवेल : सलमान खान याच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये आज सोमवारी दोन अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या पनवेल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञात घुसल्याचा संशय सुरक्षा रक्षकांना आल्यानंतर लगेच त्यांनी पोलीसांना बोलावून अज्ञान व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. अजेशकुमार गिल आणि गुरुसेवकसिंह सीख अशी घुसखोर तरुणांची नावे आहेत.
पोलीसांनी त्यांना अटक केल्यानंतर या दोघांकडे बनावट आधार कार्ड आढळले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवेळी सलमान फार्महाऊसमध्ये नव्हता. 150 एकरात सलमान खानचं पनवेल फार्म हाऊस पसरलेलं आहे.
घुसखोर तरुणांची अजेशकुमार गिल आणि गुरुसेवकसिंह सीख अशी नावे आहेत. जी सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये घुसली होती. अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कम्पाऊंडमधून घुसण्याचा या दोघांनी प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले असता त्यांनी आपली खोटी नावे सांगितली. मात्र सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर सलमानचं फार्महाऊस आहे. हे फार्महाऊस भाईजानची बहीण अर्पिताच्या नावावर आहे. हे आलिशान फार्महाऊस 150 एकरमध्ये पसरलं आहे. ज्यामध्ये जिम, स्विमिंग पूल आणि फॉर्मिंगची सर्व व्यवस्था आहे. शेतीसह घोडेस्वारीसाठी देखील जागा राखून ठेवली आहे.