पुणे : राज्यातील काही भागात पाऊस पडला आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा या भागांत शुक्रवारी आणि आज हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाप्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीत द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला. बुलढाणा जिल्ह्यात मका आणि गहू जमीनदोस्त झाले आहे.
दरम्यान अजून दोन दिवस राज्यातील काही भागांत पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. पुणे हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
सांगलीमध्ये अवकाळी पाऊस
सांगली शहरात रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तारांबळ उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पावऊस पडला. या पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पाऊस
बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्या सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. आव्हा, तळणी, लिहा, पिंप्री गवळी या परिसरासह इतर गावात पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाले. हरभरा, मका आणि गहू तर अक्षरशः झोपला, चिखलात लोळत होता. यापूर्वीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा या भागातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातून नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात पाऊस
अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात संभाजीनगरमध्ये पाऊस पडला. यामुळे वधूवरा सोबत वऱ्हाडी मंडळीही पावसामध्ये भिजली. दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.