मुंबई : नवी मुंबईत बारा वर्षीय मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंववार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून 29 वर्षीय तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील पनवेल या ठिकाणी ही घटना घडली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी २९ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीशी लग्न केले. दोघांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरुण आणि पीडित मुलगी हे दोघेही मुळचे साताऱ्या जिल्ह्यातील आहेत. तरुणाने सहा महिन्यांपूर्वी पीडित तरुणीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले.
बलात्कार करून मुलगी गर्भवती राहिल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी पनवेल येथे स्थानिक डॉक्टरांनी पाहणी केल्यावर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती उघडकीस आली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी पोलिसांना याची माहिती दिली.
या घटनेअंतर्गत पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहिता (आयपीसी), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.