राजेंद्रकुमार शेळके
पुणे : येथील कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयातील प्रा. यशवंत गुलाब आढाव यांना सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी–सिओइपी टेक्निकल युनिव्हर्सिटी यांची इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी शाखेतील पीएचडी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
‘रिअल टाइम मेजरमेंट सिस्टिम फॉर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लीड ऍसिड बॅटरी इलेक्ट्रोलाईट’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ. डी. एन. सोनावणे, डॉ. सी. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. इतर आंतरराष्ट्रीय प्रकाशनासोबतच या विषयावरील त्यांचे पेटंट प्रकाशित झाले आहे.
या यशाबद्दल कमिन्स समूहाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, तंत्रनिकेतन महाविद्यालय हडपसर येथील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.