Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : वळती येथे बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला; कुत्र्यांमुळे वाचला मालकाचा जीव

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 26 November 2024, 18:39
Leopard caught by forest officer in rahu daund Pune

उरुळी कांचन, (पुणे) : डोंगर परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्या – मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या वळती (ता. हवेली) येथील एका 41 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केल्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्यक्तीने समयसूचकता दाखवल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.

 

वळती ग्रामपंचायत हद्दीतील वरचा मळा परिसरात मंगळवारी (ता. 26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बापू पांडुरंग कुंजीर (वय – 41, रा. वळती, ता. हवेली) असे समयसूचकता दाखवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात शेतकरी व पशुपालक यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बापू कुंजीर व त्यांच्या गावातील आणखी काही नागरिक दररोज वळती परिसरातील वरचा मळा परिसरात व डोंगर भागात जनावरे व शेळ्या चरण्यासाठी घेऊन जातात. मंगळवारी सायंकाळी घरी जाताना वाटेवर एका ठिकाणी एक बिबट्या दबा धरून बसला होता. यावेळी बापू कुंजीर हे त्यांच्या शेळ्या या लांब गेल्याने घरी वळवून आणण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर तीन कुत्रेही बरोबर होते.

यावेळी दबा धरून बसलेला बिबट्या त्यांना दिसून आला. यावेळी त्यांनी त्याच्याकडे पाहिले असता त्याने बापू कुंजीर यांच्या दिशेन धाव घेतली. यावेळी समयसूचकता दाखवत कुंजीर यांनी शेजारी असलेल्या काटवनात उडी घेतली. यावेळी त्यांच्या अंगाला जखमा झाल्या. वळती व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असून पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहे. जनजागृती अन् इतर ठोस उपाययोजना करून देखील बिबट्याला काही फरक पडत नसल्याचे नागरिकांनी सांगीतले.

कुत्र्यामुळे वाचला मालकाचा जीव

बिबट्याने ज्या वेळेस हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्यांच्या बरोबर असलेल्या तीन कुत्र्यांनी जोरदार भुंकण्यास सुरुवात केली. तसेच बापू कुंजीर यांनी मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणावरून बिबट्याने पळ काढला. त्यामुळे बिबट्या पळून गेल्याने बापू कुंजीर यांचा जीव वाचला.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News : वाकड येथे स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची निर्दोष मुक्तता..

Tuesday, 28 April 2026, 11:09

Good News : क्षणाचीही विलंब न करता… चंदननगर पोलिसांची आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाचवला जीव

Tuesday, 28 April 2026, 10:49

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

Tuesday, 28 April 2026, 10:21
Next Post
drone scheme for farmers in maharashtra government

ड्रोन योजना महाडीबीटी संकेतस्थळावर उपलब्ध; ऑफलाईन पद्धत तात्काळ बंद करण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.