पुणे, ता. 28 : आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. चंदननगर पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. Good News

चंदननगर पोलीस ठाण्यातील महात्मा फुले मार्शल पथकातील पोलीस अंमलदार तलवारे आणि सतीश कतारी हे नियमित सोमवारी (ता. 27 ) गस्तीवर होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याच वेळी एमडीटी मशीनवर #CFS36230850 या क्रमांकाने “आत्महत्येचा प्रयत्न” (Suicide Attempt) चा तातडीचा कॉल प्राप्त झाला. कॉलरशी संपर्क साधल्यावर “वडिलांनी घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,” अशी धक्कादायक माहिती मिळाली. Good News
क्षणाचाही विलंब न करता मार्शल पथक दिलेल्या पत्त्यावर धावले. दरवाजा आतून बंद असल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ वेल्डरला बोलावून घेतले. काही मिनिटांत दरवाजा उघडण्यात आला आणि आत प्रवेश करताच संबंधित व्यक्ती गळफास घेण्याच्या अवस्थेत असल्याचे भीषण दृश्य समोर आले. पोलिसांनी तत्परतेने धाव घेत त्या व्यक्तीला खाली उतरवले आणि बेडवर बसवून त्यांचा जीव वाचवला. Good News
या धाडसी कृतीमुळे काही क्षणांत होणारी मोठी अनर्थ टळला. त्यानंतर संबंधितांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणून समुपदेशन केले आणि मानसिक आधार देत पुढील काळजीसाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांची जाणीव विशेष ठरली. Good News
दरम्यान, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या हस्ते दोन्ही अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. चंदननगर पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे एक जीव वाचला असून, “पोलीस फक्त कायदा राखत नाहीत, तर जीवही वाचवतात,” असा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे. Good News






