Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा; सेवा रस्ता आणि मुख्य मार्गावरच रांगा, पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 10:34

Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. २ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा टँकर चालकांच्या मनमानीमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एचपीसीएल कंपनीच्या टँकरांनी सेवा रस्ता आणि मुख्य महामार्गावरच अक्षरशः रांगा लावल्याने लोणी काळभोर परिसरात सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. Loni Kalbhor

शनिवारी (ता. २) सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून लोणी स्टेशन परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. कामावर जाणारे नागरिक, शाळकरी मुले, रुग्णवाहिका आणि सार्वजनिक वाहतूकही या कोंडीत अडकून पडली. अनेकांना तासन्तास उशीर सहन करावा लागला. महामार्गावरील सेवा रस्ता हा स्थानिक वाहतुकीसाठी असताना त्याचा वापर टँकर पार्किंगसाठी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मोठमोठे टँकर रस्त्याच्या कडेला नव्हे, तर थेट रस्त्यावर उभे केल्याने वाहतुकीसाठी जागाच उरलेली नव्हती. त्यामुळे मुख्य रस्त्यावरही वाहनांची कोंडी वाढत गेली आणि संपूर्ण परिसर ठप्प झाला. Loni Kalbhor

या गंभीर परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी टँकर चालकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करून दंड वसुली करण्यात गुंतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “नियम फक्त सामान्यांसाठीच का? मोठ्या कंपन्यांच्या टँकरांना मोकळीक का?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. Loni Kalbhor

 

रस्त्यावर उभे असलेले टँकर आणि कोंडीतून वाट काढणारी वाहने यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी वारंवार होत असलेल्या या प्रकारांनंतरही ठोस उपाययोजना का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Loni Kalbhor

दरम्यान, लोणी काळभोर आणि हडपसर पोलिस या प्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी तात्काळ कारवाई करून महामार्ग मोकळा करण्याची आणि टँकर चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. Loni Kalbhor

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28
Next Post

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.